अविरत वाटचाल
नवी मुंबई, 25 मे 2018 :
कोपरखैरणे भागातील सेक्टर 11 येथील महापालिका शाळेचा गेट अंगावर पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज घडली आहे. तर त्याच्या सोबत असलेला मुलगाही जखमी झाला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोपेरखेरने सेकटर- 11 मध्ये हि महापालिकेची शाळा असून या शाळेचे काम सुरू होते.शाळेच्या आवाराला गेट लावलेले आहे मात्र गेट बसवताना योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे हा गेट पडला आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास या विभागात राहणारी मुले शाळेच्या आवारात क्रिकेट खेळत होती, यावेळी बॉल बाहेर जाऊ नये यासाठी मुलांनी गेट लावला, परंतु गेट लावताच हा गेट मुलांच्या अंगावर पडला , यात सौरभ चौधरी या मुलाच्या डोक्यावर गेटआदळला. त्याला हॉस्पीटल ला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. नीलेश देवरे या दुस-या मुलाच्या पायावर गेट पडला.