- 25 जून रोजी मतदान, 26 जून रोजी निकाल
अविरत वाटचाल
नवी मुंबई, 25 मे 2018:
भारत निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2018 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून रोजी मतदान होवून 26 जून रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 मे पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- नामनिदर्शेन अर्ज 31 मे ते 7 जून 2018 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) पहिला माळा, कोकण भवन, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई यांच्या दालनामध्ये स्विकारण्यात येतील.
- प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 जून 2018 रोजी सकाळी 11 पासून करण्यात येईल.
- 11 जून 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
- 25 जून 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान घेण्यात येईल.
- 28 जून 2018 रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे.
24 मे पासून आचारसंहिता
- मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघासाठी आदर्श आचारसंहिता 24 मे 2018 पासून अमलात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी
- मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदार संघ, कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभाग हे राहतील.
- उप आयुक्त (समान्य प्रशासन), कोकण विभाग, जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा हे सदरच्या निवडणूकीकरीता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
- कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरीता उप आयुक्त (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.