- सात पुरस्कारांवर राज्याची मोहोर
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 23 मे 2018:
केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा पश्चिम विभागातील बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला असून या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारावर राज्याने मोहोर उमटवली आहे.
केंद्र शासनाकडून देशातील चार विभागांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यांचा तसेच दादरा व नगर हवेली आणि दीव- दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.
- राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार,राष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी, उत्कृष्ट पशुवैद्यक, उत्कृष्ट कृत्रिम रेतन सेवा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाले आहेत.
पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारासाठी पशुधनाची उत्पादकता, पशुवैद्यकीय सेवेचा दर्जा, रोग नियंत्रण, पशुप्रजनन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी, कृत्रिम रेतनाचे काम, रोग प्रादुर्भावासंदर्भातील माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यास प्रतिसाद, केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पशुसंवर्धन योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याचा विस्तार कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करण्यात आला. देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे जतन व संवर्धन यावर ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’मध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार’सह पुढील पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.
- राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार
प्रथम पुरस्कार– अनिरुद्ध भगिरथ पाटील, तरसाली, ता. बागलाण, जि. नाशिक
- उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार
प्रथम पुरस्कार– डॉ. अनिल तुळशीराम परिहार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय, कराड (जि. सातारा)
द्वितीय पुरस्कार– डॉ. दिनकर भाऊराव बोर्डे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय, पंढरपूर (जि. सोलापूर)
- उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पुरस्कार
द्वितीय पुरस्कार– बाळासाहेब तुकाराम कोल्हे, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, बायफ, सोनेवाडी, ता. कोपरगाव (जि. अहमदनगर)
द्वितीय पुरस्कार– डॉ. अनिल विठ्ठलराव इंगोले, पशुधन विकास अधिकारी, सासवड (जि. पुणे)
राष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी : प्रथम पुरस्कार