कर्जत- खोपोली दरम्यान 19 आणि 20 मे रोजी मेगाब्लॉक

अविरत वाटचाल

मुंबई, 18 मे 2018 :

मध्य रेल्वेच्या कर्जत आणि खोपोली या स्थानकांदरम्यानच्या पुलांच्या दुरूस्ती कामासाठी शनिवार 19 मे आणि 20 मे या दोन दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पलळसदरी ते खोपोली दरम्यान 9 ते 4 वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे.

19 मे आणि 20 मे रोजी सीएसएमटी हून सकाळी 7.30 वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.

19,20 मे रोजी कर्जत हून सकाळी 10.40 आणि 11.55 ला सुटणारी खोपोली लोकल, खोपोलीहून 10 वाजत, 11.20 वाजता आणि 12.40 ला सुटणारी कर्जत लोकल रद्द करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.