20 मेच्या मेगाब्लॉकमुळे मेन आणि हार्बरवरील वेळापत्रक बदलले

अविरत वाटचाल

मुंबई, 18 मे 2018

रेल्वेमार्ग आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर येत्या रविवारी 20 मे रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मेन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या काळात गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मेन मार्गावरील मेगाब्लॉक

ठाणे-कल्याण डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या काळात मेगाब्लॉक

  • सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर,विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. याशिवाय ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान डाउन स्लो मार्गावर चालविल्या जातील  तसेच या दरम्यानच्या सर्व स्थानकांवर गाड्या थांबतील. त्यामुळे या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.

 

  • सकाळी 10.37 ते दुपारी 3.6 या काळात ठाणे येथून सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

 

  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

 

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक

 

  • सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या काळात सीएसएमटी, वडाला ते वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या कालात सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी सुटणाऱ्या सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

 

  • सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या तसेच सकाळी 1045 ते दुपारी 4.58 या काळात अंधेरी,वांद्रे आणि गोरेगाव ते सीएसएमटीदरम्यान  अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

हार्बरच्या प्रवाशांसाठी विशेष गाडी

  • मेगाब्लॉकच्या काळात पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. फलाट क्रमांक 8 वरून या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

 

  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात पश्चिम रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.