मराठा आरक्षण जन सुनावणीत 2290 निवेदने प्राप्त

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 16 मे 2018:

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगानी मराठा आरक्षणा संदर्भात आज कोकण भवन येथे घेतलेल्या सुनावणीत कोकण विभागामधील रायगड जिल्हा व नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विविध संस्था, संघटना आणि व्यक्तिगत स्वरुपाची 2290 निवेदने स्विकारल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी दिली.

कोकण भवनमधील पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोगातर्फे आज दुपारी 11 ते 5 या वेळेत ही जाहीर जनसुनावणी घेण्यात आली होती. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सुधीर ठाकरे, डॅा. दत्तात्रय बाळसराफ, डॉ सुवर्णा रावळ, डॉ भूषण कर्डिले तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख  आदी उपस्थित होते.