अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 15 मे 2018:
“द कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या” (आयसीएसई) वतीने घेण्यात आलेल्या आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कुलचा विद्यार्थी स्वयम दास याने दहावीत 99.40 टक्के गुण प्राप्त करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या उज्वल यशाबद्दल स्वयम दास याचे महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्या दिल्या.
यावेळी सभागृह नेते रविंद्र इथापे व शिक्षणाधिकारी संदीप संगवे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.