अविरत वाटचाल न्यूज
नवी दिल्ली, 15 मे 2018:
कर्नाटकातच्या जनतेने भाजप ला दणदणीत विजय मिळवुन दिला असून काँग्रेसला पराभवाची धूळ चारून जबरदस्त चपराक दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारला बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र कर्नाटकच्या जनतेने उधळले आहे.कर्नाटक च्या विधानसभेची निवडणूक ही आगामी लोकसभानिवडणुकीची रंगीत तालीम ठरली असून आगामी सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातील सरकार पुन्हा विजयी होणार असल्याची प्रतिक्रिया रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
- मागील चार वर्षे काँग्रेस सतत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोणी कितीही प्रयत्न केला तरी आगामी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींची टीमच निवडणूक जिंकणार असाच कौल कर्नाटक च्या जनतेने दिला आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला
- काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दलितासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार असल्याचे विधान केले होते. मात्र काँग्रेस चे हे दलीतप्रेम बेगडी आहे. भाजपविरुद्ध कितीही भडकविण्याचा प्रयत्न झाला तरी कर्नाटकच्या दलितांनी काँग्रेसचे बेगडी प्रेम नाकारले आहे. हाच कर्नाटकच्या निवडणूक निकालाचा अर्थ आहे, असे आठवले यांनी सांगितले.