मालडुंगे ग्रामपंचायतीमधील शेकापचे डॅशिंग कार्यकर्ते धर्मा उघडा व मंगेश पारधी यांनी त्यांच्या समर्थकांसह आज (दि. १५) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला, ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापला आणखी एक हादरा बसला आहे.
- मालडुंगे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २७ मे रोजी असून या निवडणुकीच्या रणधुमाळीत मालडुंगे ग्रामपंचायतीमधील लहान धामणी गावातील शेकापचे धर्मा नामा उघडा आणि आणि मंगेश राघो पारधी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.
- पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
- यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिद, विकास भगत, रामदास मगर, अनुसूचित जमाती सेलचे जिल्हा चिटणीस सिताराम चौधरी, पनवेल तालुका अध्यक्ष गणपत वारगडा, काळुराम वाघ, किसन चौधरी, कमळू चौधरी, कान्हा खंडवी, चंद्रकांत दोरे, अनंत शिद, राघो भगत, अनंता चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.