अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 1 मे 2018:
महाराष्ट्र राज्याच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण तसेच विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आजच्या कामगार दिनाचे औचित्य साधून उत्तम काम करणा-या प्रत्येक विभागातील एका सफाई कामगारास महापौर व आयुक्त यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
बाळाराम कंबा ठाकूर (मुख्यालय), रघुनाथ भाऊ बोराडे (बेलापूर), अमृता कृष्णन (नेरूळ), नाना भुजंग बनसोडे (वाशी), संजय केशव तांबे (तुर्भे), धोंडीराम पांडुरंग भंडारे (कोपरखैरणे), अंकुश सोमा लांगे (घणसोली), धनाजी पाटील (ऐरोली), दत्ता काशिनाथ कोळी (दिघा) यांचा उत्तम कामाबद्दल सन्मान करण्यात आला.
नवी मुंबईचा स्वच्छ शहर हा नावलौकिक टिकवून ठेवण्यामध्ये ज्या घटकांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे अशा सफाई कर्मचा-यांचा आज कामगार दिनाचे औचित्य साधून सन्मान करताना विशेष आनंद होत असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले.