टेम्पोची ओमनी कारला धडक; पाच जणांचा मृत्यू

अविरत वाटचाल न्यूज

पनवेल, 30 एप्रिल 2018:

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आदई टोल नाक्याजवळ आज पहाटे मागून येणा-या टेम्पोने ओमनी कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभार जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानखुर्दहून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी मानखुर्द येथे राहणा-या आठ जण ओमानी कारने पहाटे निघाले होते. पनवेल पासून पुढे सहा किलोमीटर अंतरावर ओमानी कार बंद पडली. ही कार दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पनवेल च्या दिशेने येताना आदई टोल नाक्या जवळ मागून येणा-या टेम्पोने या कारला धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रूग्णालयात मृत्यू झाला. संतोष प्रजापती, रशीद नफिज खान, जुंमन शौरतअली शेख, दिनेश जैस्वाल, अयोध्या यादव अशी मृतांची नावे असून रामचंद्र यादव,संजय छोटेलला राजभर, मुंद्रिका प्रसाद जैस्वाल हे तिघे गंभीर जखमी असून त्याच्यांवर कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.