मुंबई अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहन दाखल
अविरत वाटचाल
मुंबई, 23 एप्रिल 2018:
नैसर्गिक आपत्ती किंवा आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करत असतात. त्यामुळे अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहने असणे गरजेचे आहे. त्यासाठीच कंट्रोल पोस्ट वाहन आणि मिनी फायर टेंडर या वाहनांचा समावेश आज मुंबई अग्निशमन दलात करण्यात आला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
अग्निशमन दलाला उत्तमोत्तम काम करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी वार्षिक अग्निकवायत स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा
बक्षिस वितरण समारंभ महाडेश्वर यांच्या हस्ते आज भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र, येथे पार पडला. यावेळी समाजवादी पक्षाचे गटनेते व स्थानिक नगरसेवक रईस शेख, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( शहर) श्री.ए.एल. जऱहाड, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभाग रहांगदळे आदि उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अग्निशमन केंद्राचा पुरस्कार मानखुर्द अग्निशमन केंद्राने तर सर्वोत्कृष्ठ अग्निशमन जवानाचा पुरस्कार पावडे यांनी पटकाविला.
कंट्रोल पोस्ट वाहन
- नियंत्रण कक्षाला दुर्घटना स्थळाची माहिती काही क्षणात सचित्र उपलब्ध व्हावी म्हणून या वाहनात आधुनिक दळणवळण यंत्रणा
- सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व संगणक आदींची व्यवस्था
मिनी फायर टेंडर
- या वाहनामध्ये वॉटर मिस्ट व पियरसिंगची सोय
- या प्रणालीव्दारे स्टिल प्लेट, कॉक्रीटची भिंत, लाकडाच्या वस्तू इत्यादींना छिद्र पाडून बाहेरुनच आग विझवता येणे शक्य