- 4 हजार 771 रिक्तपदांसाठीही मतदान
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 23 एप्रिल 2018:
राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.
- ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील.
- या अर्जांची छाननी14 मे 2018 रोजी होईल.
- नामनिर्देशनपत्रे16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल.
- मतदान27 मे 2018 रोजी सकाळी30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
- गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी30 पासून दुपारी केवळ3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.
- मतमोजणी28 मे 2018 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74,
औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7,परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.
पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या)
ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.