ठाणे शहर, वागळे इस्टेट परिसराला फायदा
अविरत वाटचाल
ठाणे, 21 एप्रिल 2018:
ठाणे महापालिका हद्दीतील वागळे इस्टेट व ठाणे शहर या भागांना बृहन्मुंबई महापालिकेकडून ५ द.ल. लि. पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. या अतिरिक्त पाणी साठ्यामुळे वागळे इस्टेटआणि शहरातील पाणी टंचाई दूर होणार आहे.
ठाणे महापालिकेतील पाणी टंचाई बाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बृहन्मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला ५ द.ल. लि. पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. पाणी पुरवठ्याचे क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. हा अतिरिक्त पाणी पुरवठा टेकडी पाणी जलकुंभामध्ये सुरु करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना प्रति दिन ४८० द.ल. लि. एवढा पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा हा ठाणे महानगरपालिकेची स्वयोजना असलेल्या एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका स्टेम इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन प्रा.लि. यांच्यामार्फत करण्यात येत असून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट आणि ठाणे शहर याभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.