उद्या सीवूडस् येथे अग्निशमन साहित्य प्रदर्शन
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 14 एप्रिल 2018:
14 एप्रिल या अग्निशमन दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल या कालावधीत नवी मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 14 ते 20 एप्रिल या कालावधीत शहरात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकांचे तसेच अग्निशमन साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अग्निशमन दिनानिमित्ताने शहीद स्मृतीस्तंभास पुष्पचक्रे अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी महापौर जयवंत सुतार, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आदि मान्यवर उपस्थित होते. अग्निशमन दलातील जवान तत्परतेने काम करीत आहेत, त्या सोबतच नवी मुंबईकर नागरिकांनीही व्यक्तिगत व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी असे आवाहन महापौर सुतार यांनी केले.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी लोकांच्या जिविताची तसेच मालमत्तेची हानी रोखणारी अग्निशमन ही अत्यंत महत्वाची सेवा असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल कमी अधिकारी-कर्मचारी संख्येत चांगले काम करीत असून आता अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणावर तत्परतेने भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
अग्निशमन सेवा सप्ताहाचे वेळापत्रक
- 15 एप्रिलला सेक्टर 27, नेरूळ मध्ये मिलेनियम सोसा. येथे प्रात्यक्षिकांतून अग्निसुरक्षेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. याशिवाय सीवूड ग्रँड सेंन्ट्रल मॉल येथे सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन तसेच प्रात्यक्षिके
- 16 एप्रिलला वाशी येथील फोरच्युन हॉटेल, सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथील पंजाब नॅशनल बँक येथे अग्निसुरक्षेची प्रात्यक्षिके
- 17 एप्रिलला बर्न हॉस्पिटल ऐरोली, सेक्टर 10, सीबीडी बेलापूर येथील कपास भवन
- 18 एप्रिलला व्हिनस फर्निचर दिघा
- 19 एप्रिलला सेक्टर 29 वाशी येथील पसायदान सोसायटी