अविरत वाटचाल न्यूज/ मुंबई, 11 एप्रिल 2018:
सौर उर्जेचा वापर वाढावा या हेतूने देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर सौर पॅनेल बसवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय रेल्वे, रेल्वे स्थानके आणि रेल्वे अखत्यारितील इमारतींवर 500 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानके आणि इमारतींवर सौर पॅनेल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पश्चिम रेल्वे अंतर्गत मुंबईतील माटुंगा रोड स्थानक, जगजीवनराम हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, ग्रांट रोड, चर्चगेट स्थानक यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे अंतर्गत कामन, नेरळ, टिकेकरवाडी, सांगोला, दौंड, खंडाळा, उंबेरमाळी, थानसेट, माथेरान, आसनगाव, पेण, भुसावळ, पुणे, राहुरी, पुणतांबा, अहमदनगर स्थानक, केईएम स्थानक, जुनारदेव स्थानक, पांढुरणा स्थानक, सीएसएमटी ॲनेक्स इमारत, सीएसटीएम पार्सल इमारत, माटुंगा स्थानक (मध्य/पश्चिम), खोपोली या स्थानकांचा समावेश आहे.