अविरत वाटचाल न्यूज/ 7 एप्रिल 2018:
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पशुपक्ष्यांवर उपचार करण्यासाठी जुईनगर, नेरुळ विभागात दुमजली पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव महानगरपालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
पशुपक्ष्यांवर उपचार करण्यासाठी नवी मुंबईत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी जुईनगर, नेरुळ विभागात पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नेरुळ विभागातील जुईनगर से. 24 मधील भूखंड क्र. 5 व 6 येथे पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याकरीता सिडकोकडून 920.774 चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेला आहे. या भूखंडावर पशुपक्षी यांची चिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत स्वरुपाचे पशुवैद्यकिय रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे.
रूग्णालयाचे वैशिष्ट
- रुग्णालय इमारतीत 11 हजार चौ.फुटाचे आर.सी.सी. बांधकाम
- रूग्णालयाच्या उभारणीसाठी 5 कोटी खर्च अपेक्षित
- इमारतीमध्ये तळमजल्यावर लहान / मोठ्या प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया व तपासणी कक्ष, स्टेरलायजेशन रुम, चेंजींग व प्रिपेरेशन रुम, डॉक्टर रुम, प्रतिक्षा कक्ष, कुत्र्यांकरीता दोन स्वतंत्र विभाग, पक्षांकरीता कक्ष
- दुस-या मजल्यावर ऑफिस व मिटींग रुम, पेन्ट्री, रेकॉर्ड रुम, लॉन्ड्री व स्टोअर रुम, औषध वाटप कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, कर्मचारी विश्रांती कक्ष
- प्रत्येक मजल्यावर स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे व्यवस्था
- प्राण्यांकरिता व नागरिकांकरिता स्वतंत्र उद्वाहक (लिफ्ट) व्यवस्था असणार आहे.