अविरत वाटचाल न्यूज/ मुंबई, 6 एप्रिल 2018:
महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तास करण्यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या टोल फ्री क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या नवीन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, असे महावितरणने जाहीर केले आहे.
- टोल फ्री क्रमांक
- 19120
- 1800-102-3435
- 1800-233-3435