पनवेलकरांना आता एक दिवसआड पाणीपुरवठा

  • 19 मार्चपासून निर्णयाची अंमलबजावणी
  • पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी दोन झोनची निर्मीती

पनवेल  मुंबई, 16 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

मे महिना अद्याप दूर असतानाच पनवेलकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या देहरंग धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. शिल्लक पाणीसाठा 15 जून पर्यंत पुरेल असे नियोजन करण्यासाठी महापालिका क्षेत्रात 19 तारखेपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी दोन झोन तयार करण्यात आल्याचे पनवेल महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

  • पनवेल शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एम.आय.डी.सी. आणि देहरंग धरण मिळून एकत्रितपणे पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एम.आय.डी.सी. या संस्थेस पाताळगंगा नदीत दर रविवार, सोमवार या दिवशी पाताळगंगा नदीतून कमी पाणी मिळते आणि इतर काळात शटडाऊन, ब्रेकडाऊनमुळे या दोनही ठिकाणांहून कमी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे दोन झोन तयार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

झोन 1

  • सर्व्हिस हौद येथील जुन्या उंच जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा

लोकमान्य नगर, रेल्वे मालधक्का झोपडपट्टी, शिवाजी नगर झोपडपट्टी, विसावा हॉटेल लगत झोपडपट्टी, पंचायत समितीलगत झोपडपट्टी, सुभेदार वाडा, संपूर्ण लाईन आळी, सावरकर चौक, परदेशी आळी, पटेल पार्क, अशोका गार्डन परिसर,श्री लॉज ते नीलेश गार्डनपर्यत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, रोज बाजार परिसर, शिवाजी रोड, केतकी हॉटेल ते आदर्श हॉटेल ते विरूपाक्ष मंदिर ते जयभारत नाका परिसर, विरूपाक्ष मंदिर ते धृतपापेश्वर कारखाना परिसर, जयभारत नाका ते मिरची गल्ली परिसर, जयभारत नाका ते  मांडवकर वाडा, जयभारत नाका ते गोखले हॉल ते प्रज्ञा सोसायटी परिसर, रोटरी सर्कल ते सरस्वती विद्यामंदिर ते पंचमुखी मारूती मंदिर, श्रीराम सोसायटी, जैन मंदिर, भुसार मोहल्ला परिसर, कोहिनूर टेक्निकल ते रोटरी सर्कल इत्यादी.

  • पटेल मोहल्ला येथील उंच जलकुंभातून होणार पाणीपुरवठा

संपूर्ण पटेल मोहल्ला, कोळीवाडा, वाणी आळी, धोबी आळी, पांजरपोळ, मिरची गल्ली, कुंभारवाडा, भारत नगर झोपडपट्टी, कच्छा मोहल्ला, बंदररोड, बावन बंगला (काही भाग) इत्यादी.

  • वडघर पॉंइंटवरून होणारा पाणीपुरवठा

मार्केड यार्ड ते पाटील यांच्या घरापर्यंत, रजदा सोसायटी, हिबा अपार्टमेंट, ताज सोडा फॅक्टरी परिसर, कोळीवाडा- उरण रोड ते जरीमरी देवी मंदिरापर्यंत, एस.एस.ई.बी.ऑफिस ते बागवान मोहल्ला, उरण रोड सर्कल ते पंचमुखी सोसायटी( भारत गॅस) इत्यादी

20 फेब्रुवारीपासून एक दिवसआड पाणीपुरवठा होणारी ठिकाणे

झोन 2

  • सर्व्हिस हौद येथील नवीन टाकीतून होणारी पाणीपुरवठा 

आझाद नगर झोपटपट्टी, नवनाथ नगर झोपटपट्टी, तक्का गाव, तक्का संपूर्ण कॉलनी, संपूर्ण मिडलक्लास सोसायटी, टेलिफोन ऑफिस मागील सोसायट्या, न्यू पंजाब हॉटेल ते विश्राळी नाका, विश्राळी तलावालगत झोपडपट्टी व परिसर इत्यादी.

  • हरिओम नगर टाकी- बंद असल्याने डायरेक्ट पंपाव्दारे पाणीपुरवठा

जानेवकर वाडा परिसर, अशोक बाग झोपडपट्टी, वाल्मीकी नगर, पायोनिअर परिसर, एच.ओ.सी. कॉलनी, गजानन सोसायटी, एच.ओ.सी. कॉलनी ते प्रांत ऑफिसपर्यंत इत्यादी.

  • ठाणा रोड येथील टाकी

ठाणा रोड त उर्दूशाळेपर्यंत, बुशरा पार्क, संपूर्ण साईनगर

  • भाजीमार्केट येथील उंच जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा

भाजी मार्केट उंच जलकुंभ ते रूपाली टॉकीज, शनी मंदिर ते रोहिदास वाडा, शनी मंदिर ते पंतरत्न ह़ॉटेल ते विश्राळी नाका, पंचरत्न हॉटेल ते डॉ. हळदीपूरकर हॉस्पिटल, शनि मंदिर ते मिरची गल्ली (एक बाजू)

  • वडघर पॉइंटवरून होणारा पाणीपुरवठा

हरे माधव सोसायटी परिसर आदेश मस्ले सॉ. मिल ते वसंत आलाप सोसायटी परिसर, गुरूशरम सोसायटी व परिसर, रॉयल रेसिडेन्सी, तिरूपती सोसायटी.

———————————————————————————————————————————————————————————————-

 

पनवेलला पाणी पुरवठा करण्याच्या मुद्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे स्पष्टिकरण…