- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 16 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज :
वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदूषणालर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात 100 टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने चालविण्यात येणाऱ्या 25 हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते , एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनेत मुंबई व एमएमआरडीएचा समावेश केल्याबद्दल केंद्र शासन आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा आपल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.
केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान देण्यात आले आहे. या हायब्रीड बसमुळे 30 टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘बेस्ट’ला यापूर्वी 40 इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या आहेत. लवकरच 80 बसेस देण्यात येणार असल्याचे अनंत गीते यांनी यावेळी सांगितले.
हायब्रीड बसची वैशिष्ट्ये
- 31 अधिक 1 अशा आसन क्षमतेच्या एकूण 25 बसेस चालविणाऱ्या जाणार
- बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बांद्रा कुर्ला संकुल या मार्गावर चालणार
- सकाळी 7.30 ते 8.30 आणि सायं. 6 ते 7 या वेळेत फेऱ्या चालणार
- तसेच बांद्रा कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानक दरम्यान शटल सेवा
- बेस्ट मार्फत ही सेवा चालविण्यात येत आहे.
- भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली बस
- हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर 30 टक्के बचत
- इतर बसच्या तुलनेत 28.24 टक्के इंधन बचत
- संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता
- संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
- आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन व व्हिलचेअरसाठी
- उताराची व्यवस्था
- गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती
- जीपीआरएस यंत्रणा