- 19 मार्चपासूनच 10 टक्के पाणी कपात सुरू होणार
नवी मुंबई, 15 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
सिडको प्रशासनाने आपल्या अधिकार क्षेत्रातील पाणी पुरवठ्यामध्ये 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 19 मार्चपासूनच ही पाणी कपात लागू होणार असल्यामुळे सिडकोच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या भागाला फटका बसण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा धरण व सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेतुन पुढील वर्षाचा पाणीपुरवठा अबाधित ठेवण्याच्या कृति योजनेंतर्गत सद्यस्थितीत सिडको अधिकार क्षेत्रातील पाणी पुरवठ्यात दिनांक 19 मार्च 2018 पासून 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे .
या काळात नवी मुंबई महापालिका क्षेत्राव्यतिरिक्त सिडको अधिकार क्षेत्रातील रहिवाश्यांना कमी पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.
पनवेलला पाणी पुरवठा करण्याच्या मुद्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे स्पष्टिकरण…