ठाण्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3 अधिक सुट्ट्या

नवी मुंबई, 15 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज :

ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अधिक तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार 23 जुलै रोजी आषाढी एकादशी, 17 सप्टेंबर रोजी ज्येष्ठगौरी विसर्जन,  आणि 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दर्शी हे दिवस स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्तांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.