सीवूड येथील महापालिका शाळा सुरू करा

  • भाजप सीवूडचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांना साकडे

 नवी मुंबई, 15 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

सीवूड सेक्टर 50 येथे दोन वर्षापूर्वी बांधलेली शाळा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना हक्काची शाळा मिळावी यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात या इमारतीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे प्रभाग क्रमांक 108 चे विभाग अध्यक्ष सुधीर जाधव यांनी केली आहे.

 

नवी मुंबई सीवूड परिसरातील अनेक खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या खासगी शाळांची फी अधिक असल्यामुळे सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकांमधील पालकांना त्यांच्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशावेळी सीवूड परिसरात नवी मुंबई महापालिकेची हक्काची शाळा असणे गरजेचे आहे. नवी मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सीवूड सेक्टर 50 मध्ये शाळेची इमारत उभारली आहे मात्र ती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना हक्काची शाळा उपलब्ध व्हावी यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात (2018-19) या इमारतीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी आणि गरजू विद्यार्थ्यांना हक्काचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नवी मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता घंगाळे आणि वॉर्ड अध्यक्ष सुधीर जाधव यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

सीवूड परिसरात अनेक खासगी शाळा आहे. मात्र या शाळांमध्ये  परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील मुले प्रवेश घेवू शकत नाही. अशावेळी  महापालिकेने महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून या गरजू मुलांना न्याय द्यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

-सुधीर जाधव, भाजप सीवूड वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 108

 


 

पनवेलला पाणी पुरवठा करण्याच्या मुद्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे स्पष्टिकरण…