मुंबई, 9 मार्च 2018/ अविरत वाटचाल न्यूज:
पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून 1300 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य्य मंजूर केले आहे.
- शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर उभारणी करण्यात येत आहे.
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) त्याची अंमलबजावणी करण्यास अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
- या मेट्रो मार्गाची लांबी 23.3 कि.मी. असणार आहे.
- या प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी रुपये आहे.
- केंद्राकडून मिळणाऱ्या 1300 कोटी रुपये निधीमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
- केंद्र सरकारच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.