संग्रहित फोटो
नवी मुंबई, 7 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
नवी मुंबई महापालिका हद्दीत अनधिकृत नळजोडण्या करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.गेल्या आठवड्याभरात 148 अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या असून 62 बुस्टर पंप हटविण्यात आले आहेत. मे 2017 पासून अशा 10720 इतक्या अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.
काही ग्राहक आपल्या नळ जोडण्यांवर बुस्टर पंप बसवून पाणी खेचून घेताना दिसतात. त्यामुळे त्या परिसरातील इतर रहिवाश्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो तसेच कमी पाणी मिळते. म्हणून अशा प्रकारचे पंप शोधून त्यावर कारवाई केली जाते. मे 2017 पासून 168 बुस्टर पंप हटविण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्याठिकाणी पाणी चोरून वापरण्यात येत आहे अथवा विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्यात येत आहे त्यांच्यावर रितसर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत.