मुंबई, 5 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
राज्यात सध्या 257 गावांना 238 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, भास्कर जाधव, सुनील केदार, अब्दुल सत्तार आदींनी लेखी प्रश्न विचारला होता.
चंद्रकात पाटील यांचे लेखी उत्तर
- सन 2017 मधील खरीप हंगामात 14 हजार 679 गावांमध्ये अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेमधील निकषानुसार या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही.
- मराठवाड्यात यावर्षी सरासरी 72.90 टक्के पाऊस झाला आहे. खरीप हंगामात 3577 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. औरंगाबाद विभागात 111 गावे व 3 वाड्यांना 138 टँकरद्वारे पाणी पुवरठा केला जात आहे.
- विदर्भातील 9799 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. केंद्र शासनाच्या दुष्काळ संहिता 2016 च्या निकषाबाबत राज्य शासनाचे अभिप्राय कळविण्यात आले आहे. सध्या 238 टँकरद्वारे 257 गावे व 4 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.