होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 4 सुपरफास्ट एक्सप्रेस

नवी मुंबई, 23 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज :

लागोपाठच्या सुट्ट्या तसेच होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते करमाळी दरम्यान 4 विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. २८ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

एलटीटी-करमाळी सुपरफास्ट एक्सप्रेस (२)

  1. गाडी क्रमांक ०२०३५ स्पेशल गाडी २८ फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री ८.५० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक ०२०३६ ही विशेष गाडी १ मार्च रोजी सकाळी ७.२५ ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता एलटीटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  •  गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना ३ थ्री टायर एसी, ६ स्लीपर क्लास आणि ४ सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

एलटीटी-करमाळी सुपरफास्ट एक्सप्रेस (२)

  1. गाडी क्रमांक ०२०३७ विशेष गाडी १ मार्च रोजी रात्री ८.५० ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक ०२०३८ ही गाडी २ मार्च रोजी सकाळी ७.२५ ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता एलटीटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना ३ थ्री टायर एसी, १२ स्लीपर क्लास आणि ८ सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

या गाड्यांचे आरक्षण

गाडी क्रमांक ०२०३५ आणि गाडी क्रमांक ०२०३७ या विशेष गाड्यांचे तिकिट बूकिंग २६ फेब्रुवारी रोजी रेल्वेचे अधिकृत तिकिट काउंटर तसेच www.irctc.co.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सेकंड क्लास डब्यासाठी तिकिटाचे बूकिंग करणे अनिवार्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.