- श्रीगोंदा येथून सुरुवात तर नाशिकमध्ये समारोप
मुंबई,14 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:
विदर्भ,मराठवाडयामध्ये हल्लाबोल आंदोलन यशस्वी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्या,१५ फेब्रवारीपासून सुरू होणार आहे. 21फेब्रुवारीपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या अहमदनगर, नाशिक, नंदुरबार,जळगाव,धुळे या पाच जिल्हयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या 21 सभा होणार आहेत. 10मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राच्या हल्लाबोलची सांगता नाशिकमध्ये होणार आहे.
या हल्लाबोल आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक, विदयार्थी, सर्व सेलचे अध्यक्ष, आमदार,खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
- 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीगोंदा, दुपारी 4 वाजता शेवगांव, सायंकाळी 7.30 वाजता राहुरी,
- 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अकोले, दुपारी 4 वाजता कोपरगाव, सायंकाळी 7 वाजता येवला,
- 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निफाड, दुपारी 2 वाजता दिंडोरी, सायंकाळी 5 वाजता कळवण,
- 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सटाणा, दुपारी 4 वाजता नवापूर, सायंकाळी 7 वाजता शहादा,
- 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर, दुपारी 3 वाजता चोपडा, सायंकाळी 6 वाजता पारोळा,
- 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रावेर, दुपारी 3 वाजता बोदवड, सायंकाळी 6.30 जामनेर,
- 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता धरणगाव, दुपारी 3 वाजता पाचोरा, सायंकाळी 7 वाजता चाळीसगाव येथे जाहीर सभा होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.