सर्वसाधारण बससाठी पहिल्या 12 किलोमीटरपर्यंत दरवाढ नाही
नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज :
नवी मुंबई परिवहन उपक्रमाने नवी मुंबई आणि मुंबई परिसरात आपली सेवा देण्यास सुरूवात केली आहे. मात्र ओला व उबेर टॅक्सी सेवेमुळे वातानुकूलीत बसेसच्या प्रवासी संख्येवर याचा परिणाम जाणवत आहे. आता या टॅक्सी सेवांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी
परिवहनने वातानुकूलीत बसच्या दरात कपात केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर केलेल्या सुधारीत तिकीट दराला 19 जानेवारीच्या बैठकीत मिळालेल्या मंजुरीनुसार परिवहन उपक्रमाकडून आजपासून सुधारीत तिकीट दर लागू करण्यात आले आहेत.
-
परिवहनच्या सुधारीत तिकीट दरात 0 ते 12 कि.मी. च्या प्रवास भाडयात सर्वसाधारण बसेससाठी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
-
सर्वसाधारण व वातानुकूलीत बस प्रवासासाठी परतीचे तिकीट (Return Ticket) घेतल्यास तिकीट दरात 10% सूट राहील. सदर तिकीट रात्री 12 वाजेपर्यंत ग्राहय राहील.
-
रात्री 00 ते पहाटे 5.00 या वेळेत जलद सेवेचे भाडे आकारण्यात येईल.
-
परिवहन उपक्रमाच्या फक्त सर्वसाधारण बसेसमधून 65 वर्षे वयावरील (महाराष्ट्र शासन निर्णयानुसार) जेष्ठ नागरीकांना प्रवास भाडयात 50% सवलत देण्यात येत आहे.
-
परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त केलेल्या दिव्यांग व्यक्तींना परिवहन उपक्रमाच्या सर्वसाधारण बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा राहील.
-
परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील शालेय गणवेष परिधान केलेल्या विदयार्थ्यांना फक्त शालेय दिवसात परिवहन उपक्रमाच्या सर्वसाधारण बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा राहिल.
-
ओळखपत्रधारक HIV +ve रुग्णांना परिवहन उपक्रमाच्या सर्वसाधारण बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा राहील.
-
प्रौढ भाडे देणाऱ्या प्रवाशाला 3 वर्षाखालील 1 मुल आसनावर न बसविता विनातिकीट स्वत: बरोबर घेवून जाता येईल.
-
3 ते12 वर्षापर्यंतच्या बालकांस अर्धे तिकीट आकारण्यात येईल.
-
स्वातंत्र्यसैनिकांना उपक्रमाच्या सर्वसाधारण बसेसमधुन मोफत प्रवासाची सुविधा राहील.
-
उपक्रमाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून महानगरपालिका अधिनियम 1949 कलम क्र. 343(4) नुसार सर्वसाधारण बससाठी रु.250/- व वातानुकूलीत बससाठी रु.500/- अधिक प्रवास भाडे दंड आकारणी करण्यात येईल. तसेच बसमध्ये प्रवासासाठी घेतलेल्या तिकीटापेक्षा जादा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सर्वसाधारण बससाठी रु.100/- व वातानुकूलीत बससाठी रु.200/- अधिक प्रवास भाडे दंड आकारणी करण्यात येईल.