नेरुळ प्रभाग क्रमांक ९६ मध्ये नागरी कामांना सुरूवात  

  • नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नेरूळ प्रभाग क्रमांक 96 मधील नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या प्रभागातील नागरी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या नागरी कामांचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  नगरसेविका रुपाली भगत गेल्या दोन वर्षांपासून आपल्या प्रभागातील नागरी कामांबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होत्या.

या कार्यक्रमाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, विधी समिती सभापती गणेश  म्हात्रे, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवक अध्यक्ष सुरज पाटील, समाजेसवक वर्गीस डेनियल, ब प्रभाग समिति सदस्य मनोज मेहेर, समाजसेवक संजय पाथरे, शरद सरवदे, पांडुरंग बेलापुरकर, नाना घोगरे, रंगनाथ बारवे, अशोक गांडाल, सागर मोहिते, एस गनेशन, विरेंद्र रत्ने, सुरेखा देठे, प्राजक्ता प्रभु, सूजाता सोलट, मनी कंदूला, चेतन खांडे, धीरज सूर्यवंशी, विकास तिकोणे, समधान कांबले, अशिष क़दम, गोरक्षनाथ गांडाल, जयकुमार ढमाले, दिलीप खांडे, चंद्रकांत महाजन, आनंद पवार, शांताराम मातेले कैलास घागरे, अंकुश माने, अनंत कदम, कुणाल भालेराव, दीपक जाधव, सत्यवान घाडी, सुरेश ठाकूर, महादेव गर्जे, संजय गर्जे, सुधाकर गर्जे, अशोक पिंगळे, शांताराम कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर इंगवले, प्रतिभा खंडागळे, सायली घाडी, छाया चव्हाण, धनंजय मतकर, संतोष शिंदे, धनाजी कचरे, सुरेश बोराटे, दादा पवार, अहमद सय्यद, गुलाब लोंढे, प्रमोद प्रभू, अनिता कादवडकर, असिफ शेख, मन्सूर कोतावडेकर, राजेश घाडी, रोहित चव्हाण, आकाश पाटील, रुपेश यादव, प्रवीण पाटील, आनंद शेडगे, विठ्ठल गांजवे, सोपान शिंदे, विष्णू देठे, उर्मिला शिंदे, उज्वला जगताप, उज्वला खांडे, कचरे काकी, रुपाली गलांडे, आशालता सुकाले, सखाराम जांभळे, विजय चव्हाण, अमित मोरे, पोपट पवार, कैलास चव्हाण, मालन जांभळे, रोहन म्हापणकर, विनय शेडगे, मदन शेडगे, अमर मोरे, राकेश तांडेल, अमर भोईर, बाजीराव धुमाळ व स्थानिक नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

 

प्रभागात स्वच्छता मोहिम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेरुळ पश्चिम तालुका अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागात स्वच्छता अभियान राबवून स्वतः गणेश भगत, नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी आपल्या कार्यकर्ते आणि सफाई कामगारांच्या सहकार्याने प्रभागातील रस्ते पदपथ स्वच्छ करून नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे अवाहन केले

 

क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

तसेच नेरुळ सेक्टर-१६,१६ए,१८,१८ए,२० आणि २४ मधील युवकांसाठी दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी  तीन दिवसीय मोफत प्रवेश अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली स्पर्धत एकूण ३८ संघांतील ३०४ खेळाडूंनी भाग घेतला

  • स्पर्धत प्रथम पारितोषिक नेरुळ -८ संघ नेरुळ गाव ५५५५+आकर्षक चषक,
  • व्दितीय पारितोषिक शिवगर्जना संघ नेरुळ सेक्टर-१८ ३३३३+चषक
  • तृतीय पारितोषिक त्रिमूर्ति ८ सेक्टर १६ए ११११+चषक
  • चौथे aacc-8 नेरुळ सेक्टर १८ आणि पाचवे क्रमांक सेन्चुरी सोसायटी सेक्टर-१६ मिळालेल्या संघास ५५५+चषक मालिकावीर अजय नवले  ,उत्कृष्ट फलंदाज सिद्धेश कडू  ,उत्कृष्ट गोलंदाज राहुल म्हात्रे ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश पाटील  यांना पारितोषिक  देऊन सन्मानित करण्यात आले.