4 फेब्रुवारीला सीएसएमटी ते दादर ट्रॅफिक ब्लॉक

  • परळ आणि करी रोड स्थानकावर फुट ओवर ब्रिज गर्डर बसविण्‍याचे काम करणार

मुंबई, 3 फेब्रुवारी 2018/ अविरत वाटचाल न्यूज:

मध्य रेल्‍वे उद्या परळ आणि करी रोड स्‍थानकावर फुट ओवर ब्रिजचा गर्डर बसविण्‍यासाठी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दादर दरम्‍यान मेन लाइन (सर्व 4 मार्गावर) विशेष ट्रॉफिक आणि पावर ब्लॉक घोषित केला आहे. सकाळी सकाळी 8.30 वाजलयापूसन दुपारी दुपारी 4.30 पर्यंत 8 तासांचा अप फास्‍ट लाइन वर तर सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारी 3.30 पर्यंत सहा तासांचा डाऊन फास्‍ट तसेच अप फास्ट आणि डाऊन स्‍लो मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या काळात सीएसएमटी ते दादरदरम्यानच्या लोकल बंद ठेवण्यात येणार असून लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

ब्लॉक पूर्व गाडयांचे वेळापत्रक

  • शेवटची लोकल अप फास्ट मार्गावर दादरहुन सकाळी 8.12 वाजता सुटेल
  • शेवटची लोकल अप स्लो मार्गावर दादरहुन सकाळी 9.00 वाजता सुटेल
  • शेवटची लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहुन सकाळी 9.05 वाजता सुटेल
  • शेवटची लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहुन सकाळी 9.12 वाजता सुटेल

ब्लॉक नंतरचे गाड्यांचे वेळापत्रक

  • पहीली लोकल अप स्लो मार्गावर दादरहुन दुपारी 3.35 वाजता सुटेल
  • पहीली लोकल अप फास्ट मार्गावर दादरहुन दुपारी 4.38 वाजता सुटेल
  • पहीली लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहुन दुपारी 3.40 वाजता सुटेल
  • पहीली लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहुन दुपारी 3.50 वाजता सुटेल

 

  • सीएसएमटीकडे येणा-या उपनगरीय सेवा दादर / कुर्ला स्थानकापर्यंत चालवल्या जातील आणि दादर / कुर्ला येथून ब्लॉकच्या काळात डाउन दिशेने चालविण्‍यात येतील. दादर, कुर्ला आणि ठाणे येथे समाप्त होणा-या / सुटणाऱ्या गाड्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील.

 

हार्बर आणि ट्रांस हार्बर मार्गावरील सेवा निय‍मित वेळापत्रकानुसार चालतील.तसेच मेन लाइनवरील प्रवाशांना कुर्ला आणि सीएसएमटीदरम्यान हार्बर मार्गावरून सकाळी 9 ते सायंकाळी 4 या काळात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात येणार नाही.

 

 

लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक

  • 3 फेब्रुवारी रोजी सुटणा-या खालील गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.
  1. गाडी क्रमांक 11024 कोल्हापुर – सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस
  2. गाडी क्रमांक 12140 नागपुर – सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस
  • 4 फेब्रुवारी रोजी सुटणा-या खालील गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.
  1. . गाडी क्रमांक 11009/11010 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
  2. . गाडी क्रमांक 22101/22102 सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस
  3. . गाडी क्रमांक 12123/12124 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्‍वीन एक्सप्रेस
  4. . गाडी क्रमांक 1210 9/12110 सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
  5. गाडी क्रमांक 12125/12126 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
  6. गाडी क्रमांक 12139 सीएसएमटी-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस
  7. गाडी क्रमांक 11023 सीएसएमटी-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस
  • अप मेल / एक्सप्रेस गाड्यांना रेगुलेट/ शॉर्ट टर्मिनेट केले जाईल
  1. दिनांक 2.2.2018 रोजी हावड़ायेथून निघणारी गाडी क्रमांक 12321 हावड़ा-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला ठाणे स्‍थानकात शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
  2. दिनांक 3.2.2018 रोजी चेन्नईहुन निघणारी गाडी क्रमांक 11042 चेन्नई – सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळासाठी थांबविली जाईल आणि दादर स्‍थानकात टर्मिनेट केली जाईल.
  3. दिनांक 3.2.2018 रोजी वाराणसीहुन निघणारी गाडी क्रमांक 11094 वाराणसी-सीएसएमटी मुंबई महानगरी एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळासाठी थांबविली जाईल आणि दादर स्‍थानकात टर्मिनेट केली जाईल.
  4. दिनांक 3.2.2018 रोजी हैदराबादहुन निघणारी गाडी क्रमांक 17032 हैदराबाद-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळ थांबविण्‍यात येईल. ही गाड़ी 17.30 वाजता सीएसएमटी मुंबई ला पोहचेल.

 

4 फेब्रुवारी रोजीच्या पुढील गाड्यांचे रि शेड्युलिंग करण्यात येईल

  1. गाडी क्रमांक 12869 सीएसएमटी मुंबई -हावड़ा एक्सप्रेस नव्या वेळेनुसार दुपारी 15.35 वाजता (निर्धारित वेळ 11.05 वाजता) सुटेल.
  2. गाडी क्रमांक 16339 सीएसएमटी मुंबई – नागरकोइल एक्सप्रेस नव्या वेळेनुसार दुपारी 16.25 वाजता (निर्धारित वेळ दुपारी 12.10 वाजता) सुटेल.
  3. गाडी क्रमांक 17031 सीएसएमटी मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस नव्या वेळेनुसार सायंकाळी 17.10 वाजता (निर्धारित वेळ दुपारी 12.45 वाजता) सुटेल.
  4. गाडी क्रमांक 11041 सीएसएमटी मुंबई – चेन्नई एक्सप्रेस नव्या वेळेनुसार सायंकाळी 17.50 वाजता (निर्धारित वेळ शनिवार दुपारी 14.00 वाजता) सुटेल.
  5. गाडी क्रमांक 1101 9 सीएसएमटी मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस नव्या वेळेनुसार दुपारी 15.20 वाजता (निर्धारित वेळ दुपारी 15.10 वाजता) सुटेल.
  6. गाडी क्रमांक 12322 सीएसएमटी मुंबई – हावड़ा कोलकाता मेल नव्या वेळेनुसार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.10 वाजता (निर्धारित वेळ 4 फेब्रुवारी रोजी  रात्री 21.30 वाजता) सुटेल.
  7. गाडी क्रमांक 11027 सीएसएमटी मुंबई – चेन्नई मेल नव्या वेळेनुसार 5फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.45 वाजता (निर्धारित वेळ 4 फेब्रुवारी रोजी रात्री 23.45 वाजता) सुटेल.
  8. गाडी क्रमांक 11093 सीएसएमटी मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस नव्या वेळेनुसार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पहाटे1.10 वाजता (निर्धारित वेळ 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.10 वाजता) सुटेल.