जुईनगरमध्ये पाइपलाइन गॅस सुरू

  • महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते सेवेचा शुभारंभ

नवी मुंबई, 3 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

जुईनगर परिसरात पाइप लाइन गॅस सेवा सुरू करण्यात आली असून नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते या सेवेचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजीव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जुईनगर परिसरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि नवी मुंबई महापालिकेच्या ब प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे यांनी 2012 पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर महानगर गॅसतर्फे जुईनगर परिसरात पाइपलाइन गॅस जोडणी देण्यास सुरूवात केली आहे. जुईनगर सेक्टर 24 येथील महालक्ष्मी सोसायटीमध्ये या कामाचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजीव नाईक यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी महापालिका सभागृह नेते रवींद्र इथापे आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, महापालिका सभागृह नेते रवींद्र इथापे आदी मान्यवरांनी विजय साळे यांच्या कामाचे कौतूक केले.

  • दरम्यान, अधिकाधिक लोकांना पाइपलाइन गॅस जोडणीचा लाभ मिळावा यासाठी नागरीकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी महानगर गॅसकडे करावी, तसेच अधिक माहितीसाठी 9821155164 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विजय साळे यांनी केले आहे.