मेगाब्लॉकमुळे आज (28 जानेवारी)गाड्या अशा धावणार

मुंबई, 28 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

रेल्वे मार्गांची दुरूस्ती तसेच देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर 28 जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मेन लाइन

ठाणे-कल्याण डाउन फास्त लाइनवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या काळात

  • सकाळी 9.25 ते दुपारी 2.45 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ठाणे आणि कल्याण या स्थानकांच्या दरम्यान डाउन स्लो मार्गावर चालविण्यात येतील, शिवाय या दरम्यान सर्व स्थानकांवर गाड्या थांबतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड,विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

 

हार्बर मार्ग

कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळई 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात

  • सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 या काळात सीएसएमटीवरून पनवेल,बेलापूर,वाशीच्या दिशेने सुटणाऱ्या सर्व गाड्या तसेच सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 या काळात पनवेल,बेलापूर,वाशी येथून सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्य आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 या काळात ट्रान्स हार्बर आणि मेन लाइनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.