मुंबईहून पनवेलकडे येणारी वाहतूक जुन्या पुलावरून वळवणार
नवी मुंबई, 21 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
सायन- पनवेल मार्गावरील वाशी येथील नवीन खाडीपुलावर दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईहून पनवेल कडे जाणारा मार्ग वीस दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई हून पनवेल कडे जाणारी वाहतूक जुन्या खाडी पूलावरून वळविण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी हा मार्ग खुला राहणार आहे तर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अवजड वाहने वाशी ऐवजी वाहतूक पूर्व द्रुतगती मार्गावरून ऐरोली येथून वळविण्यात आली आहेत. ही वाहने मुंबईहून मुंबई- नाशिक हायवेने (पूर्व द्रुतगती मार्ग) व्रिक्रोळी- ऐरोली टोलनाका- दिवागाव सर्कल ऐरोली नवी मुंबई येथून डावीकडे वळण घेऊन पटनी कंपनी ऐरोली- मुकुंद चौकी- ठाणे बेलापूर मार्गे- रबाले- महापे-तुर्भे मार्गावरून पुढे जातील. अशी माहिती नवी मुंबई वाहतूक पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी दिली.