पनवेल, 17 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
स्थानिकांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तळोजा नजिक खुटारी येथे स्थानिक टेम्पो, ट्रक चालक-मालक वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यात आलेल्या या असोसिशिएनच्या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी स्थायी समीती सभापती अमर पाटील, पाणी पुरवठा सभापती निलेश बाविस्कर, सार्वजनिक उद्याने, बाग, तलाव व शहर सुशोभीकरण सभापती विकास घरत, नगरसेवक संतोष भोईर, वासुदेव घरत, चाहूशेठ पाटील, संजय भगत यांच्यासह पदाधीकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.