महावितरणच्या नाट्यस्पर्धेचा जल्लोष

ठाणे,16 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

महावितरणमधील कर्मचाऱ्यांची नाट्य स्पर्धा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे रंगली या स्पर्धेचे  उद्घाटन 16 जानेवारीला महावितरणचे संचालक (संचालन) अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतिश करपे, भांडूप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित होते.

  • स्पर्धेचा प्रारंभ भांडूप नागरी परिमंडळाच्या ‘नजर कैद’ या नाटकाने झाला. ‘प्रेम ही मानवी जीवनातील हळुवार संकल्पना; पण हेच प्रेम मानवाला कधीकधी सर्वाधिक हिंस्त्र बनवते’ या संकल्पनेवर हे नाटक आधारित होते. डॉ.संदीप वंजारी,  दिपेश सावंत, योगेश मांढरे व अविनाश शेवाळे, वर्षा इदुला पल्ली, दीप्ती थोरात, रमेश नाईक, हिना दावडा या कर्मचार्यांनी सादर केलेल्या या नाटकाचे लेखन अभिजीत वाईलकर यांनी तर दिग्दर्शन संदीप वंजारी यांनी केले आहे. तर रंगमंच व्यवस्था उदय गुरव यांनी पाहिली होती. राजेश पंडित यांनी प्रकाश योजना तर रंगभूषा व वेशभूषा लक्ष्मण खडके व हेमा कदम यांनी पाहिली.
  • दुसऱ्या सत्रात कल्याण परिमंडळाचे ‘एन्जॉय’ हे नाटक सादर झाले. ‘शासकीय कार्यालय, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या भिन्न स्वभाव, अनेक अडचणी आणि तरीही जनतेशी असणारी बांधिलकी जपणारा एक अधिकारी यांची कथा या नाटकात उभी करण्यात आली होती’. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष बोकेफोंडे यांचे आहे. या नाटकात मंगेश अहिरे, राजेंद्र खरात, सुभाष तुपे, विकास पगारे, प्रशांत जाधव, निखील जाधव, श्रुतिका मांजरेकर, राजन कांगणे, राहुल कदम, निखील चंदनशिवे, पल्लवी जाधव, प्रदीप बावकर, भरत वाघेला, विक्रांत शिंदे या कर्मचार्यांनी भूमिका साकारल्या. प्रवीण करगुटकर यांनी प्रकाश योजना तर रंगभूषा व वेशभूषा शशी संकपाळ यांनी पाहिली.
  • 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रकाशगड या सांघिक कार्यालयाचे ‘ते गाव मागे राहिले’ हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन असगर वजाटत यांनी तर दिग्दर्शन विठ्ठल सांवत यांनी केले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू यांच्या दुपारी 1 वाजता होणार आहे.