मुंबई, 11 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:
तिकीटांसाठी लागणा-या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर 24 ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर (ओसीआर) कियॉस्क बसविण्यात आले आहेत. यामुळे मोबाईल ऑपमध्ये तिकीटांचे बुकिंग करून त्याची प्रिंट ओसीआर कियॉस्कव्दारे उपलब्ध होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 4, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर प्रत्येकी 5 ओसीआर कियॉस्क बसविण्यात आले आहेत.
तिकीटासाठी लागणारी रांग टाळण्यासाठी मोबाईल ऑपवर बुकिंग केलेले उपनगरीय रेल्वे तिकीटांची प्रिंट या ओसीआर कियॉस्कमध्ये उपलब्ध होणार आहे. मोबाईल तिकीट प्रिंटिंगसाठी जीपीएसची आवश्यकता लागणार नाही. या कियॉस्कमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे तसेच मोबाईल ऑप बुकिंगला चालनाही मिळेल असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.
ओसीआर कियॉस्क कसे वापराल
- मोबाईल ऑपवर तिकीट बुक करून पेपर तिकीटचा पर्याय निवडा.
- यानंतर प्रवाशांना तीन ओळींचा कॅरेक्टर कोड, बुकिंग आयडी यांसोबत एसएमएस मिळेल. हा मेसेज उघडून कियॉस्को स्लॉटमध्ये मोबाइल फोन ठेवावा लागेल. यानंतर तिकीटाची प्रिंट मिळेल.