मुंबई, 8 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
मुंबई महापालिकेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या रविवारी (14 जानेवारीला) ‘बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० ते ११.३० या कालात मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्यान व मैदानांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे गट व विषय
गट क्रमांक 1 – इयत्ता 1 ली ते 2 री
- माझी मुंबई
- माझा आवडता खाऊ
- माझे आवडते खेळणे
गट क्रमांक 2 – इयत्ता 3 री ते 5 वी
- मुंबईतील जत्रा
- आम्ही गणपती बनवतो
- मुंबईच्या समुद्राची सफर
गट क्रमांक 3 – इयत्ता 6 वी ते 8 वी
- मुंबईतील गणेशोत्सव
- मुंबईतील संध्याकाळ
- माझ्या स्वप्नातील मुंबई
गट क्रमांक 4 – इयत्ता 9 वी ते 10 वी
- मुंबईची जीवनशैली
- मुंबईची लाईफ लाईन
- माझी सुरक्षित मुंबई
या स्पर्धेकरिता पुढील उद्यान व मैदाने निश्चित करण्यात आली आहेत.
- ‘ए’ विभाग – हर्निमल सर्कल, ‘बी’ विभाग – सीताराम मिल, शेनॉय मैदान; ‘सी’ विभाग – स. का. पाटील उद्यान, ‘डी’ विभाग ऑगस्ट क्रांती मैदान, ‘ई’ विभाग – वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), भायखळा (पूर्व)
- ‘एफ/दक्षिण’ विभाग – कामगार मैदान, परळ; ‘एफ/उत्तर’ विभाग – पाच उद्यान अ, पाच उद्यान ब, पाच उद्यान क, ‘जी/दक्षिण’ विभाग – संत ज्ञानेश्वर उद्यान, दादर , श्रमिक जिमखाना; ना.म.जोशी मार्ग ‘जी/उत्तर’ विभाग – महापौर निवास, शिवाजी पार्क
- ‘एच/पूर्व’ विभाग – एम. आय. जी. क्रिकेट क्लब, वांद्रे (पूर्व); ‘एच/पश्चिम’ विभाग – कमला रहेजा उद्यान (राजेश खन्ना उद्यान), रोटरी , गजधर पार्कजवळ; ‘के/पूर्व’ विभाग – छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, पंपहाऊस व वास्तू इमारतजवळ, अंधेरी (पूर्व); शहीद विजय साळसकर उद्यान, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड, अंधेरी (पूर्व) ‘के/पश्चिम’ विभाग – अंधेरी क्रीडा संकुल, अंधेरी (पश्चिम);
- ‘पी/दक्षिण’ विभाग – प्रबोधनकार ठाकरे मैदान, आरे कॉलनी महापालिका शाळा मैदान; ‘पी/उत्तर’ विभाग – स्वामी विवेकानंद क्रीडांगण, नवजीवन शाळेजवळ, राणीसती मार्ग, मालाड (पूर्व); चाचा नेहरु क्रीडांगण, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम) आणि आण्णा सावंत मनोरंजन उद्यान, मार्वे रोड, मालाड (पश्चिम); प्रियदर्शिनी इंदिरा गांधी उद्यान, पारेखनगर, मालाड (पूर्व) ‘आर/दक्षिण’ विभाग – बजाज रोड मराठी शाळा मैदान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समता नगर; चारकोप महापालिका शाळा मैदान, सेक्टर – १, चारकोप; ‘आर/मध्य’ विभाग – वीर सावरकर उद्यान, ‘आर/उत्तर’ विभाग – जरीमरी उद्यान, सी. एस. मार्ग, दहिसर (पूर्व)
- ‘एल’ विभाग – जय जवान, जय किसान उद्यान, नेहरुनगर उद्यान, ‘एम/पूर्व’ विभाग –देवनार कॉलनी गार्डन, आर. सी. एफ कॉलनी गार्डन, ‘एम/पश्चिम’ विभाग – लोकमान्य टिळक मैदान, आचार्य उद्यान, चेंबूर
- ‘एन’ विभाग – गुरु गोविंदसिंग मैदान, घाटकोपर (पूर्व); रहेजा उद्यान, लालबहादूर शास्त्री मार्ग, पेट्रोल पंपासमोर, घाटकोपर (पश्चिम); ‘एस’ विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान; ‘टी’ विभाग – डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान, मुलुंड (पूर्व); लाला तुळशीराम उद्यान, मुलुंड (पश्चिम); सरदार प्रतापसिंग उद्यान, मुलुंड (पश्चिम).
- या स्पर्धेला अधिकाधिक मुलांनी हजेरी लावावी, असे आवाहन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे.