मध्य रेल्वेचा रविवारी (7 जानेवारी) मेगाब्लॉक

मुंबई, 6 जानेवारी 2017/avirat vaatchal news:

रेल्वे मार्गाची दुरूस्ती तसेच इतर तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर उद्या रविवारी (7 जानेवारी) रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकदरम्यान  मेन आणि हार्बर मार्गावर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

मुलुंड-माटुंगा अप स्‍लो मार्गावर सकाळी 11.10  ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत

  •  ठाण्याहून सकाळी 10.37 ते दुपारी 4.02 या काळात अप धीम्‍या मार्गावर निघणा-या सर्व उपनगरीय सेवा मुलुंड आणि माटुंगा स्‍थानका दरम्‍यान अप जलद मार्गावर वळविण्‍यात येतील. ह्या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील.  माटुंगा स्‍थानकापासून या  गाड्या अप स्‍लो मार्गावर वळविण्‍यात येतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.16 पासून दूपारी 2.54 वाजेपर्यत प्रस्‍थान करणा-या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍या व्‍यतिरिक्‍त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्‍थानकावर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • कल्‍याण येथून सकाळी 11.04 पासून दूपारी 3.06 वाजेपर्यत प्रस्‍थान करणा-या अप मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍या व्‍यतिरिक्‍त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला स्‍थानकावर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 15 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.00 पासून सायंकाळी 06.00 वाजेपर्यत आगमन/प्रस्‍थान करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशीरा पोहचतील.
  • अप धीम्‍या मार्गाची सेवा नाहुर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्‍थानकासाठी उपलब्‍ध राहणार नाही तरीसुध्‍दा तेथील प्रवाशांना वाया मुंलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकातून प्रवास करण्‍याची परवानगी देण्यात आली आहे.

 

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस –चुनाभट्टी / बांद्रा डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्‍यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यत आणि चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्‍यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यत

 

  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड वरून सकाळी 11.34 ते दूपारी 4.47 वाजेपर्यत वाशी / बेलापुर / पनवेल येथे जाणा-या तसेच छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/अंधेरी च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापुर/वाशी वरून सकाळी 9.53 ते दूपारी 3.20 वाजेपर्यत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या तसेच अंधेरी/बांद्रा येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.09 वाजेपर्यत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
  • ब्‍लॉक काळात पनवेल-कुर्ला (प्‍लॅटफार्म क्रं. 8) या मार्गावर  विशेष लोकल चालविण्‍यात येतील.
  • ब्‍लॉक काळात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्‍वे आणि मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची मुभा राहील.