- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 3 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात जे जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
भिमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरात तणावाचे वातावरण पसरले.या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यमान न्यायमूर्तीची नियुक्ती करावी, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करणार आहोत. तरी नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
CM @Dev_Fadnavis appeals for peace and unity to all and assures that complete investigation will be taken to logical end. #BhimaKoregaon pic.twitter.com/kjEyKObGQu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 3, 2018