- वैध मापन शास्र विभागाची कारवाई
मुंबई, 2 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
राज्याच्या वैध मापन शास्र विभागाने छापील किंमतीपेक्षा अधिक पैसे आकारणे, उद्घोषणा न छापलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या राज्यभरातील 294 आस्थापनांवर कारवाई करून खटले नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईतील जे.डब्ल्यू. मॅरियट, हॉटेल लिला वेन्चर, ताज लॅंड्स एंड या पंचतारांकीत हॉटेलांसह अनेक बड्या आस्थापनांचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे मोठी हॉटेल्स,मॉल्स आणि दुकानांचे धाबे दणाणले आहेत. action against five star hotels
स्पा,सलून, मॉल्स, अपना बाझार, सुपर मार्केट अशा बड्या दुकानांमध्ये परदेशातून आयात केलेली सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट्स, सिगारेट्स आदी वस्तूंची विक्री केली जाते. मात्र ग्राहकांना नियमानुसार या वस्तू विकल्या जातात की नाही, याची तपासणी करण्यासाठी डिसेंबर 2017 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील तब्बल 569 पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल्स, मोठी दुकाने, स्पा यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वैध मापन शास्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गत येणाऱ्या इतर तरतूदींचा भंग करणाऱ्या तब्बल 294 हॉटेल्स, मॉल्स, स्पा आदींवर कारवाई करून खटले दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
विभागवार कारवाई केलेली आस्थापने
- मुंबई-73
- पुणे-21
- कोकण विभाग-10
- नाशिक -18
- नागपूर -4
खटले दाखल केलेली मुंबईतील काही बडी हॉटेल्स
- जे.डब्ल्यू.मॅरियट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंधेरी
- हॉटेल लिला वेन्चर,मुंबई
- ताज लॅंड्स एंड, वांद्रे
- सॅविओ जॉन परेरा सलून, हॉटेल सोफिटेल, बी.के.सी.
- फोर सिझन, वरळी
- शालिमार हॉटेल, केम्स कॉर्नर
ग्राहकांना तक्रारीसाठी पुढील इ मेल उपलब्ध करून देण्यात आल आहेत.
- dclmms_complaints@yahoo.com
- मुंबई –dyclmmumbai@yahoo.in
- कोकण –dyclmkokan@yahoo.in
- नाशिक – dyclmnasik@yahoo.in
- पुणे –dyclmpune@yahoo.in
- औरंगाबाद –dyclmaurangabad@yahoo.in
- अमरावती –dyclmamravati@yahoo.in
- नागपूर –dyclmnagpur@yahoo.in