मुंबई –गोवा एसी शिवशाही धावणार

  • मुंबई- पणजी मार्गावर आजपासून सुरू

मुंबई, 22 डिसेंबर 2017/avirat vaatchal news :

नाताळ  सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाने मुंबई-पणजी या ,मार्गावर  ‘ शिवशाही  ही बस सेवा आजपासून सुरु केली आहे. mumbai-gao ac shivshaaee bus

सलग सुट्ट्याच्या काळात कोकणात आणि गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ही बस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मुंबई ते पणजी या दरम्यानच्या प्रवासासाठी 913 रुपये इतके तिकिट शुल्क आकारण्यात येणार आहे. या बसमधील आधुनिक सुविधा आणि एसी असल्यामुळे इतर मार्गांवरील शिवशाही बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनाही ही बससेवा पसंत पडेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. mumbai-gao ac shivshaaee bus

 

बसचे वेळापत्रक

  • मुंबई-पणजी- बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी 5 वाजता सुटणार आहे.
  • पणजी-मुंबई – पणजीहून रोज संध्याकाळी 6 वाजता सुटणार आहे.

 

शिवशाही बसला दिलेले थांबे

  • पनवेल
  • चिपळूण
  • लांजा
  • राजापूर
  • कणकवली
  • कुडाळ
  • सावंतवाडी
  • बांदा
  • म्हापसा मार्गे पणजीला जाईल