नवी मुंबई, 20 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविंद्र उद्धव इथापे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर जयवंत सुतार यांनी इथापे यांच्या नावाची घोषणा केली. रविंद्र इथापे हे महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंतचे 12 वे सभागृह नेते ठरले आहेत.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार हे आतापर्यंत सभागृह नेते होते. मात्र जयवंत सुतार यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर सभागृहपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नगरसेवक इच्छुक होते. मात्र पक्ष नेतृत्वाने ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर रविंद्र इथापे यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.