मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ध्वज दिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले 51 हजार रुपये
मुंबई, 21 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या जमीन वाटपामध्ये शहीद सैनिकांच्या कुटूंबियांना प्राधान्य देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ध्वज दिन निधीसाठी आपल्या मानधनातून 51 हजार रुपयांचा धनादेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नल सुहास जतकर यांच्याकडे सुपुर्द केला.
माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी या शासकीय निवासस्थानी झाला. त्यावेळी ते बोलत होते. dhwaja din nidhi
यावेळी माजी सैनिकांचे कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (नि) सुहास जतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे आदी उपस्थित होते.
यावेळी विविध युद्धात, चकमकीत शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचारी याच्या कुटुंबातील सदस्यांचा तसेच जखमी झालेल्या जवान, विशेष कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सैनिक अधिकारी दीपक लिमसे यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचे कार्य अतुलनीय आहे. सैनिकांच्या व त्यांच्या कुटूंबियाना सन्मान देने हे राष्ट्राचे कर्तव्य आहे. या सैनिकांच्या व त्यांच्या परिवारामागे मागे संपूर्ण देश भक्कमपणे उभा आहे. सैनिकांचे कुटूंब हे सव्वाशे कोटी जनतेचे बृहद कुटुंब आहे. शहीद जवानांच्या परिवारास व माजी सैनिकांना चांगल्या सुविधा पारदर्शकपणे व जलद गतीने मिळावे यासाठी राज्य शासनाने उपाय योजले आहेत. तसेच स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शहिद कुटूंबाना सन्मानाने आमंत्रित करण्याचे व त्यांची सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माजी सैनिकांसाठी व शहिद जवानांच्या कुटूंबियासाठी राज्य शासनाने अनेक महत्व पूर्ण निर्णय घेतले आहेत. शहीद जवानांच्या कुटूंबियांना सहाय्य अनुदानाची रक्कम 5 लाखावरून 25 लाख रुपये एवढी वाढवली आहे. तसेच ही रक्कम 24 तासात त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहोत. ध्वज दिन निधीची माहिती ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. अपंग जवानांसाठीची सहाय्य निधीची रक्कम1 लाखावरून 4 लाख केले असून ही रक्कम दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ करण्यात येणार आहे. गौरव पुरस्कार मध्येही 200 टक्के वाढ करणे, औद्योगिक क्षेत्रात शहीद कुटूंबियांना भूखंड राखीव ठेवणे, युवकांना सैन्याची माहिती होण्यासाठी मिलिटरी टुरिझमचे आयोजन आदी निर्णय घेण्यात आले आहेत,असे पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
ध्वज दिन निधीसाठी सर्व आमदारांनी किमान 50 हजार रुपये जमा करावे, असे आवाहन करणार असल्याचेही निलंगेकर पाटील यांनी यावेळी सांगितले.