नवी मुंबई, 20 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग, आरोग्य विभाग व इंडीयन कॅन्सर सोसायटी, मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामधील महिला कक्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकांकरीता आज कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचा लाभ एकूण 35 नगरसेविकांनी घेतला. त्यात मौखिक कर्करोग, स्तनरोग व गर्भाशयाचा कर्करोग याविषयी प्राथमिक तपासणी करण्यात आली. डॉ. रुमानी श्रीवास्तव यांच्या पथकामार्फत सदर तपासणी करण्यात आली. सदर शिबिरास महापौर जयवंत सुतार, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी भेट दिली.
या शिबीराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांसाठीही करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात हे सर्वेक्षण नवी मुंबई महानगरपालिकेतील संपूर्ण कार्यक्षेत्रात करण्यात येणार आहे, याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.