टोमॅटोच्या दरात घसरण

 

 

नवी मुंबई, 11 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

गेल्या महिनाभरापासून 70 ते 80 रूपये दराने मिळणा-या टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारात टोमॅटोचे दर  सुमारे 15 ते 22 रूपये किलो पर्यंत कमी आले आहेत तर किरकोळ बाजारत हेच दर 30 रूपयांपर्यंत आहेत. tomato price 

मागील काही महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरर गेलेल्या टोमॅटोच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इतर राज्यांमधून वाशीच्या एपीएमसीमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे वधारलेले दर घसरू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. tomato price 

या राज्यांतून टोमॅटो येतोय

गुजरात, मध्य प्रदेश, जोधपूर, पंजाब या राज्यातून सध्या टोमॅटो आणि भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच भाज्यांच्या दरात घरसण झालेली दिसून येते. सोमवारी बाजारात 650 ते 675 गाड्यांची आवक नोंदविण्यात आली. दररोज साधारण 550 ते 600 गाड्या मार्केटमध्ये दाखल होत असस्याची माहिती भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कौलाश ताजणे यांनी दिली.  tomato price