. . . धंदा बंद आंदोलन करणार

  • राष्ट्रीय फेरीवाला धोरणा ची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी

नवी मुंबई, 11 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News :

नवी मुंबई महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणा नुसार पथविक्रेता अधिनियम 2014  या कायदाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नवी मुंबईतील हजारो फेरीवाले आज महापालिकेवर धडकले. नवी मुंबई हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली शहरातील फेरीवाल्यांच्या विविध 27 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय फेरीवाला धोरणा ची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास नवी मुंबई तील हजारो फेरीवाला धंदा बंद आंदोलन करतील. असा इशारा यावेळी फेडरेशनच्या वतीने देण्यात आला.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होईपर्यंत त्यांच्यावरील वकारवाई थांबवावी. फेरीवाला परवाना देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. 15 वर्षांच्या रहिवासी दाखल्याची अट 2009 पथविकैता अधिनियम कायदा नुसार कमी करण्यात यावी. शहर फेरीवाला समिती नव्याने गठीत करण्यात यावी. त्याच प्रमाणे विविध प्रभागांमध्ये प्रभाग फेरीवाला समिती तात्काळ स्थापन करण्यात यावी यांसारख्या विविध मागण्या नवी मुंबई फेरीवाला फेडरेशन च्या माध्यमातून महापालिकेकडे करण्यात आल्या.

फेरीवाला करणार धंदा बंद आंदोलन

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येणारा शेती माल हा फेरीवाल्यांकडूनच शहरात कानाकोप-यात पोहोचवला जातो. नवी मुंबईतील फेरीवाले संपावर गेल्यास हा माल तसाच पडून कोट्यावधी रुपयांचे अर्थिक नुकसान होऊ शकेल. त्यामुळे फेरीवाल्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी फेडरेशन चे सहसचिव बाळकृष्ण खोपडे यांनी केली.

आंदोलनात रविंद्र  म्हात्रे , अभिमन्यू कोळी. बळीराम अंबोरे. देवेंद्र कदम. अनिल चिकणे. शञुघन पाटील. शहनाज सय्यद. हसीना बागवान. संजय हलवाई. व मोठय़ा प्रमाणात नवीमुबई तील फेरीवाले सहभागी झाले होते.