पनवेल,11 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चौथ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक २०१७ एकांकीका’ स्पर्धेत परेल येथील एम. डी. महाविद्यालयाच्या ‘शुभयात्रा’ एकांकिकेने सर्वोत्तम कामगिरी करीत प्रथम पारितोषिक पटकाविले. atal karandak spardhaa
- दुसरा क्रमांक -ओम साई कला मंच वसईची ‘पाझर’ एकांकीका
- तिसरा क्रमांक – कवडसा मुंबईची ‘पॉज’ एकांकीका
- चौथा क्रमांक- गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीची ‘मॅडम’ एकांकीका
- पाचवा क्रमांक मुबई सीड्नहॅम महाविद्यालयाची ‘निर्वासित’ एकांकीका
मुंबर्इ, ठाणे, पनवेल , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर या नियोजित केंद्रावर प्राथमिक फेरी झाल्यानंतर या फेरीतील निवड झालेल्या २४ एकांकीकांची अंतिम फेरी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी झाला.अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बक्षिस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका नीता माळी, मुबई विद्यापीठाच्या स्टुडन्ट वेलफेरचे संचालक डॉ. सुनिल पाटील आदी उपस्थित होते. atal karandak spardhaa
स्पर्धेचे परीक्षक म्हणून लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण, मिहीर राजदा, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, समीर खरे, प्रमोद शेलार, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाटय परिषदेचे पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, कार्यवाह व स्पर्धा सचिव शामनाथ पुंडे, स्मिता गांधी, अमोल खेर, गणेश जगताप, स्मिता पुंडे, प्रशांत सदावर्ते आदींनी विशेष मेहनत घेतली. atal karandak spardhaa
लक्षवेधी एकांकिका
- दर्दपोर (अभिनय, कल्याण )
- हाईड अँड सिक (अर्वाजुन कला मंडळ, कुडाळ )
- विशेष अभिनय पारितोषिक -साक्षी कुतावडेकर (मॅडम )
नेपथ्य
- प्रथम – सानिक (निर्वासित )
- दुसरा क्रमांक – गौरव वणे (एक्सपिरिमेंट )
- तिसरा क्रमांक – सुमेध साळवी – (सिरीयल किलर )
- उत्तेजनार्थ – रोहित परब (हाईड अँड सिक )
प्रकाश यॊजना
- प्रथम – राजेश शिंदे (पाझर )
- द्वितीय – शाम चव्हाण (दर्दपोर )
- तृतीय – राजेश शिंदे – (एक्सपिरिमेंट )
- उत्तेजनार्थ – राजेश शिंदे (निर्वासित )
उत्कृष्ट संगीत
- प्रथम – अक्षय धांगट (निर्वासित )
- द्वितीय – अनिकेत/ शुभम (शुभयात्रा )
- तृतीय – रिदमिक – ( इव्होल्यूशन )
उत्कृष्ट अभिनय (स्त्री )
- प्रथम – स्मितल चव्हाण (मॅडम )
- द्वितीय – अक्षता सामंत – (दर्दपोर )
- तृतीय – काजल कुलकर्णी (पॉज )
- उत्तेजनार्थ – सायली जोशी ( इव्होल्यूशन )
उत्कृष्ट अभिनय (पुरुष )
- प्रथम – साई निरावडेकर (निर्वासित )
- द्वितीय -विनायक चव्हाण (पॉज )तृतीय – प्रतीक हिवाळे (हाईड अँड सिक )
- उत्तेजनार्थ – श्रीपाद पाटील ( डिफेन्स रेस्ट ) उत्कृष्ट लेखन – रणजीत पाटील/ ओमकार राऊत (शुभयात्रा)
उत्कृष्ट दिग्दर्शन
- प्रथम – ओमकार राऊत (शुभयात्रा)
- द्वितीय -गौरव वणे (पाझर)
- तृतीय – मनोज भिसे/प्रथमेश भाटकर (मॅडम )
- उत्तेजनार्थ – प्रथमेश पवार ( हाईड अँड सिक )