मध्य रेल्वेचा 10  डिसेंबरला मेगाब्लॉक

  • हार्बर मार्गावर विशेष गाड्या चालवणार

मुंबई, 8 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News :

रेल्वे मार्ग तसेच ओव्हरहेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने येत्या रविवारी, 10 डिसेंबर रोजी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे या दोन्ही मार्गांवरील गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. mega block on main and harbour on 10 december

 

माटुंगा-ठाणे डाऊन धीम्‍या मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20पर्यंत

  • माटुंगा येथून सकाळी 10.57 ते दुपारी 4.20 या काळात डाऊन स्लो मार्गावर धावणाऱ्या  सर्व उपनगरीय सेवा मांटुगा आणि ठाणे स्‍थानकादरम्‍यान जलद मार्गावर वळविण्‍यात येतील. या गाड्यांना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यानंतर  ठाणे स्‍थानकापासून या गाड्या डाऊन धीम्‍या मार्गावर वळविण्‍यात येतील.
  • विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहुर स्‍थानकासाठी डाऊन धीम्‍या मार्गाच्‍या सेवा उपलब्‍ध राहणार नाही.  ब्‍लॉक च्‍या दरम्‍यान ह्या स्‍थानकांवरील प्रवासी घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड स्‍थानकावरून प्रवास करू शकतात.
  • कल्‍याण येथून सकाळी 11.04 ते दुपारी 3.06 या काळात सुटणाऱ्या सर्व अप मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍या व्‍यतिरिक्‍त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11 ते  सायंकाळी 6 वाजेपर्यत येणाऱ्या आणि जाणाऱ्या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशीरा पोहचतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11 ते  सायंकाळी 6 वाजेपर्यत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनटे उशीरा पोहचतील.

 

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सांयकाळी 4.10 पर्यंत

  •  छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 पर्यंत  पनवेल / बेलापुर /वाशी येथे जाणा-या तसेच पनवेल / बेलापुर / वाशी येथून सकाळी 10.21 ते दूपारी 3.41 वाजेपर्यत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द ठेवण्यात येणार आहेत.

 

मेगा ब्लॉकच्या काळात हार्बरवर विशेष गाड्या

  • ब्‍लॉक काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्‍यात येतील.
  • ब्‍लॉक काळात सकाळी 10.00 ते दूपारी 4.30 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्‍स हार्बर/मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍यास परवानगी देण्यात आली आहे.