मुंबई, 1 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी 6 दिसंबर रोजी दादरच्या चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी मध्य रेल्वेने 12 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 6 डिसेंबर(5/6 डिसेंबरच्या मध्यरात्री ) रोजी दादर-कुर्ला/ठाणे/कल्याण आणि कुर्ला-मानखुर्द/वाशी/पनवेल या मार्गांवर 12 उपनगरीय विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष लोकल सर्व स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत.
मेन लाइन डाउन उपनगरीय गाड्या
- दादर-ठाणे विशेष लोकल दादरहून 15 वाजता सुटेल आणि 01.55 वाजता ठाणे पोहचेल.
- दादर-कल्याण विशेष लोकल दादरहून 25 वाजता सुटेल आणि 03.35 वाजता कल्याण पोहचेल.
- दादर-कुर्ला विशेष लोकल दादरहून 00 वाजता सुटेल आणि 03.15 वाजता कुर्ला पोहचेल.
मेन लाइन अप उपनगरीय गाड्या
- कुर्ला-दादर विशेष लोकल कुर्लाहून 45 वाजता सुटेल आणि 01.00 वाजता दादर पोहचेल.
- कल्याण-दादर विशेष लोकल कल्याणहून 00 वाजता सुटेल आणि 02.10 वाजता दादर पोहचेल.
- ठाणे-दादर विशेष लोकल ठाणेहून 10 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता दादर पोहचेल.
हार्बर लाइन डाउन उपनगरीय गाड्या
- कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल कुर्लाहून 30 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता मानखुर्द पोहचेल.
- कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्लाहून 00 वाजता सुटेल आणि 04.00 वाजता पनवेल पोहचेल.कुर्ला-वाशी विशेष लोकल
- कुर्लाहून 00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशी पोहचेल.
हार्बर लाइन अप उपनगरीय गाड्या
- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून 30 वाजता सुटेल आणि 02.10 वाजता कुर्ला पोहचेल.
- पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलहून 40 वाजता सुटेल आणि 02.45 वाजता कुर्ला पोहचेल.
- मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल मानखुर्दहून 10 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता कुर्ला पोहचेल.